साहिरच्या कवितांबद्दल मला नेहमीच एक आकर्षण वाटत आलं आहे. साहिरची आणि माझी पहिली ओळख कधी झाली तेही मला आता आठवत नाही, पण नक्की गालिबशी ओळख होण्याच्या आधीच झाली असावी, कदाचित माझ्या उर्दू शिकण्याच्याही आधी. साहिर लुधियानवी हे नाव ऐकलं नाही असा माणूस सापडणं विरळाच, निदान विविधभारतीवर गीत है साहिर लुधियानवी का और फिल्म का नाम है… एवढी तरी साहिरची ओळख असतेच!
मला वाटतं मी पहिल्यांदा अमृता प्रीतम वाचायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या मनात साहिरबद्दल आकर्षण निर्माण होत गेलं असावं. रसीदी टिकट मी बर्याच नंतर वाचलं, पण “एक थी अनिता” या अमृताच्या सेमी-आत्मचरित्रात्मक कादंबरीत माझी साहिरशी पहिली ओळख झाली असावी, आणि मग मी एकामागून एक साहिरच्या कविता-गझला मिळवून वाचत गेलो. तल्खियां, परछाईयां, कुल्लियाते साहिर ई. ई. कुठून कुठून मिळवून वाचत गेलो. नेटवर साहिरच्या कविता शोधत राहिलो. काही समजायचं, काही नाही समजायचं, पण हळूहळू मी साहिरच्या प्रेमात पडलोच.
साहिरची फिल्मी गीतेही सुंदर! अगदी “मेरे बाजुओं में आकर तेरा दर्द चैन पाये, तेरे गेंसुओं में छुपकर मैं जहां के गम भुला दूं”, किंवा:
कल और आयेंगे नग्मों की खिलती कलियां चुनने वाले
मुझसे बेहतर कहनेवालें, तुमसे बेहतर सुननेवालें
कल कोई मुझको याद करें, क्यों कोई मुझको याद करें?
मसरूफ जमाना मेरे लिये क्यों वक्त अपना बरबाद करे
(मसरूफ = व्यस्त, बिझी)
किंवा मग मजूर -कामगारांची भाषा बोलणारा साहिरः
आओ मेहनत को अपना ईमान बनाये
अपने हाथों को अपना भगवान बनाये
राम की इस धरती को, गौतम की भूमी को
सपनों से भी प्यारा हिंदुस्थान बनाये..
कभी कभी चा “मगर ये हो न सका, और अब तो ये आलम है के तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं; भटक रही खलाओं में जिंदगी मेरी, इन्ही खलाओं में रह जाऊंगा कभी खोकर मैं जानता हू ऐ हमनफस, मगर यूं ही कभी कभी मेरे दिल में खयाल आता है” असं काहीतरी लिहून जाणारा साहिर प्रत्येकच वेळी भुरळ पाडत जातो.
साहिरची कविता बर्याचदा तीव्र रूप धारण करते. पण मग तो त्याचं कारणही देतो – साहिरचं नाव त्याच्या वडलांने केवळ अब्दूल नावाच्या शेजार्याला शिव्या देता याव्यात म्हणून अब्दूल ठेवलं होत. साहिर हे सुंदर नाव नंतर त्यानं स्वत: स्वतःसाठी निवडलंस. साहिर गझलांमध्ये तखल्लुस वापरत नाही, पण तरी त्याचं ते कुरूप “अब्दूल हायी” हे नाव जाऊन तो साहिर लुधियानवी याच नावानं जगासमोर आला अन् चमकाला! पण जगाकडून सतत मिळत गेलेलं दु:ख हा साहिरच्या कवितांचा एक मुख्य विषयच होवून गेला. तल्खियां या त्याच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत साहिरने एक शेर लिहून ठेवलायः
दुनिया ने तजुर्बात ओ हवादिस की शक्ल में
जो कुछ मुझे दिया है वो लौटा रहा हूं मैं
(तजुर्बात = तजुर्बा चे अनेकवचन, अनुभव. हवादिस = हादसा चे अनेकवचन)
“तंग आ चुके है कश्मकशे जिंदगी से हम” या त्याच्या गझलेत याच धर्तीवर एक शेर आहे (ही गझल पुढे गुरुदत्तने प्यासा मध्ये वापरली)
हम गमजदां है लाये कहां से खुशी के गीत
देंगे वहीं जो पायेंगे इस जिंदगी से हम
साहिरने गझलेप्रमाणेच नज्मचाही फॉर्म उत्तम सांभाळला. किंबहुना, नज्ममध्येच साहिर खुलून दिसतो असं म्हणायला हरकत नाही. पण नज्मकडे जाण्याआधी आपण त्याच्या गझलांचे एकदोन शेर पाहून समोर सटकुया:
जो तार से निकली है वो धून सबने सुनी है
जो साज पे गुजरी है वो किस दिल को पता है
तुझको खबर नहीं मगर एक सादा लोह को
बरबाद कर दिया तेरे दो दिन के प्यार ने
वैसे तो तुम्ही ने मुझे बरबाद किया है
इल्जाम किसी और के सर जाये तो अच्छा
दुनिया की निगाहों में भला क्या है बुरा क्या
ये बोझ अगर सर से उतर जाये तो अच्छा
नज्मांमध्ये “कभी कभी मेरे दिल में खयाल आता है” ही तर जगजाहिरच आहे. प्यासा मध्ये वेश्यावस्तीतल्या वास्तवानं हादरून गेलेल्या गुरुदत्तवर चित्रीत “जिन्हे नाज हैं हिन्दपर हो कहां है” हे जीव जाळणारं गीत साहीरच्या “चकलें” या कवितेवर आधारीत आहे. “चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनों” ही साहिरची “खूबसूरत मोड” ही नज्म. अशा अनेक नज्म सांगता येतील, पण आज साहिरच्या ताजमहल या नज्मवर बोलायचा माझा विचार आहे. पुढे लीडर या चित्रपटात्तात्त “एक शेहनशाह ने बना के हसीं ताजमहल” ही या कवितेतली एक ओळ आहे (ते गीत मात्र माझ्या माहितीप्रमाणे साहिरचं नाहीये). या ताजमहल नज्मनं आजची पोस्ट पुर्ण करुया, पुन्हा कधीतरी या विषयावर बोलणं होईलचः
ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़तही सही
तुझको इस वादी-ए-रंगींसे अक़ीदत ही सही
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से!
(मज़हर-ए-उल्फ़त = प्रेमाचं प्रतिक, अक़ीदत = श्रद्धा)
बज़्म-ए-शाहीमें ग़रीबों का गुज़र क्या मानी
सब्त जिस राह में हों सतवत-ए-शाहीके निशाँ
उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी
(बज़्म-ए-शाही = शाही मैफिल, सब्त = अंकित, सतवत-ए-शाही = शाही दौलत)
मेरी महबूब! पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा
तू ने सतवत के निशानों को तो देखा होता
मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलने वाली
अपने तारीक मकानों को तो देखा होता
(पस-ए-पर्दा-ए-तशहीर-ए-वफ़ा = प्रेमाच्या प्रदर्शनाच्या जाहिरातीमागे, मक़ाबिर = मकबरा चे अनेकवचन, तारीक = अंधारलेले)
अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है
कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उनके
लेकिन उन के लिये तशहीरका सामान नहीं
क्योंकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे
(सादिक़ = पवित्र, मुफ़लिस = गरीब)
ये इमारात-ओ-मक़ाबिर, ये फ़सीलें,ये हिसार
मुतल-क़ुलहुक्मशहंशाहों की अज़मत के सुतूँ
सीना-ए-दहरके नासूर हैं ,कुहना नासूर
जज़्ब है जिसमें तेरे और मेरे अजदादका ख़ूँ
(पाठभेदाने मी ही ओळ “सीना ए दहर पे उस रंग ही गुलकारी है, जिसमें शामिल है तेरे और मेरे अजदाद का खूं” अशीही वाचली आहे)
(ह्या इमारती, हे कोट, हे किल्ले, स्वैराचारी शहेनशहांच्या वैभवाचे स्तंभ, हे विश्वाच्या छातीवर जुन्या जखमांप्रमाणे आहेत, अशी रंगकारी आहे ज्यात तुझ्यामाझ्या पुर्वजांचं रक्त सामिल आहे).
मेरी महबूब ! उन्हें भी तो मुहब्बत होगी
जिनकी सन्नाईने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील
उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद
आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील
(सन्नाई = कलाकारी, शक्ल-ए-जमील = सुंदर रूप)
ये चमनज़ार, ये जमुना का किनारा ये महल
ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर
हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़
(चमनज़ार = उद्यान, मुनक़्क़श = नक्षीदार)
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से!
सध्यापुरतं एवढंच! भेटू 🙂
मस्त लिहले आहे, आवडले.
म़स्त लेख !!