कुणब्याच्या घरात– प्रकाश विठ्ठल किनगावकर

नुकताच कविता-रतीच्या गेल्या २५ वर्षातील निवडक कवितांचा एक संपादित संग्रह् हाती लागला.  त्या निवडक १११ कवितांमधील मला आवडलेली ही एक, आमच्या मास्तरच्या आग्रहावरून, त्याच्यासाठी:

कुणब्याच्या घरात

१:  बाप:
बायकोच्या अंगावर
मांस नसलं तरी चालेल;
पण वावरात तीन जोड्यांचं औत लावून
मातीचा गागर चांगला हातभर पडला पाहिजे.
पोरगं खुजं निघालं – हरकत नाही;
परंतु पीक डोक्याच्या पार
गेलं म्हणजे झालं.
अन् पोरीचे हातपाय
पपईच्या टोंग्यासारखे पोकळ नि बारीक
असले तरी काही बिघडत नाही;
मात्र ज्वारीचा तोटा भरीव
आणि मुठीत मावणार नाही
असा असावा जाडजूड.

२:  माय:
पोटला पोरगी जन्माला आली आहे.
घरी पाहुणे येत-जात राहतील.
गरम गुळाचं पाणी पाजायला
लाज वाटते,
आता तरी छटाक आतपाव साखरेसाठी
काही पैसे घरी ठेवत जा.

३:  पोरगं:
दगडी पाटी
कोळशाने घासून घासून
काळी केली म्हणजे
पांढरी अक्षरं ठळक दिसतात.
गुरुजी
फुटलेल्या पाटीवरील वाक्ये
जोडून वाचताना हैराण होतात
अन् फीसाठी
वारंवार घरी धाडतात.

४:  पोरगी:
उखळलेल्या अंगणात
रांगोळी घालताना व्हावा तसा
दादाच्या खरदळाच्या जुन्या पाटीवर
चित्र काढताना त्रास होतो.
भुकेलेला बाप
वावरातून परतण्यची
चाहूल लागताच
चित्र पुर्ण होत आलं तरी
माय हिसकावून घेते लेखणी
आणि
चूल पेटविण्यासाठी
हातात देते फुंकणी.

साभार: कुणब्याच्या घरात, प्रकाश विठ्ठल किनगावकर, कविता-रती, वर्ष १५, नोव्हेंबर १९९९ – जून २०००, पॄ. ३९ ©मूळ कवीच्या अधीन

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.
This entry was posted in साभार and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to कुणब्याच्या घरात– प्रकाश विठ्ठल किनगावकर

 1. a sane man म्हणतो आहे:

  Aajach vachala ha blog. Chhan aahe, paN evaDha kami lekhan ka?

 2. Abhijeet म्हणतो आहे:

  kavitaa chaan aahet. aaNakhi lekh yeuu dyat

  • Ganesh Dhamodkar म्हणतो आहे:

   @अभिजीत/a sane man बरंच कमी लिहितोय मी, नाही का? पाहू जरा काही लिहिता आलं तर; तसा मी माझ्या दुसर्‍या ब्लॉगवर बराच लिहिता आहे; पण ते इंग्रजी!

 3. गीतांजली शेलार म्हणतो आहे:

  खरच आजही कुनाब्याचे घर असेच आहे ,अनेक ठिकाणी ! छान लिहिता !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s