कुठेतरी काहीतरी अडलंय!

आलो मी एकदाचा परत या ब्लॉगवर!  लिहायला काय? लिहायला बसलो की मी बसतो लिहित, पण हे मराठीत लिहिणं म्हणजे फारच कठीण काम, फार प्रामाणिक वगैरे होऊन बसतं ते, अन्‌ मग वांधे होतात.  त्यापेक्षा आपलं The Blog of Reflections बरं, धरलं आपलं की लिहिलं! इंग्रजीत लिहितांना आपोआप वेगावर खिळ बसत जाते अन्‌ जे काही लिहायचंय (किंवा नाही लिहायचंय) ते आपोआप सेंसॉर होत जातं.  पण मग आपण लिहितो तरी कशाला; जर सेंसॉरच करायचं असेल तर मग लिहायची काहीच गरज नाही!  पण सगळंच कुठे आपल्या मनासारखं होतं?  चालतंय, चालयचं!

थोडक्यात आतापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल की मला कंटाळा आलाय म्हणून; मलाही तसंच वाटतंय! कंटाळाच असेल हा, पण कशाचा याचा मात्र पत्ता लागत नाहीये!

सध्या Freedom at Midnight वाचतोय.  मुंबईहून आलंय माझ्यासाठी.  Thank you ही म्हटलंय मी, वाचतोय! बर्‍याच दिवसांनंतर काहीतरी वाचल्यासारखं!

खूप काही आहे, कुठेतरी काहीतरी अडलंय! असू दे!

ता. क. The Blog of Reflections साठी Windows Live Writer वापरतंच होतो, आता यालाही सेट केलं.  मराठी लिहायला प्रमुखचं IME आहे; येईल कदाचित लवकर परत मी; किंवा येणारही नाही!

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.
This entry was posted in स्फूट लिखाण and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to कुठेतरी काहीतरी अडलंय!

  1. manoj bobade म्हणतो आहे:

    व्वा यार…काय लिहितोस गणेशराव तू! काहीच नाही पण बरंच काही…पाण्याला चव नसते पण तहानेपायी खूप प्यावे वाटते….तसेच तुझे लिहिणे…प्यावे प्यावे प्यावे!

    • Ganesh Dhamodkar म्हणतो आहे:

      मला त्रास होतो हे पाणी उपसतांना; माझ्या आजुबाजुच्या लोकांना कळत नाही मला काय होतंय, समज गैरसमज होतात, घडतं-बिघडतं; पण हे उपसल्याशिवाय बरंही तर वाटत नाही. चालायचंच, चाललंय!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s