मज्मूं ए ख़याल

ग़ालिबवर लिहावं असं खूप दिवसांपासून मनात.  सुरूवातंच होत नाही.  कारणं अनेक.  ग़ालिब आसपासच असतो नेहमी.  कधी हे तर कधी ते.  काय लिहावं?  भारी कवी.  उपखंडात तरी तोड नाही, बाहेरचं आपण वाचलं नाही म्हणून बोलत नाही.

तर एकेका शेरावर जसजसं येईल तसं लिहावं हा विचार.  शेर आपल्याला उलगडतो तसा!  बाकी कुणाला कसा कुणाला कसा भावतो.  आपण आपल्या अंगानं जावं.  आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवला तेवढा देव आपला.

सुरुवात कुठून करावी हाही एक प्रश्नच.  त्या बुवानं “नक्शे फ़रियादी” पासून सुरूवात करून आधीच कित्येकांचं (अस्मादिकांसह) प्रश्नचिन्ह करून टाकलंय. आपण मधूनच सुरूवात करू, अन्‌ भटकू उगीच इकडेतिकडे.

प्रसंगाला साजेशा एका शेरापासून सुरूवात करतोय.  इतक्या दिवसांपासून ग़ालिब वाचतोय, पण कालपरवा डोळ्यात भरला हा.  मागे दोनेक वर्षांपुर्वी कधीतरी मास्तर किंवा कैलाशबरोबर यावर चर्चा झाली होती असं अंधुकसं आठवतंय :-

तालीफ़ ए नुस्खहा ए वफ़ा कर रहा था मैं
मज्मूं ए ख़याल अभी फर्द फर्द था

वफ़ेच्या नुस्ख्याची तालीफ़ करायला बसलोय तर खरा मी, पण माझ्या ख़यालांचा मजमूं मात्र अजून फर्द फर्द आहे.  तुझ्या प्रेमाच्या गोष्टींबद्दल लिहायला बसलोय, काय लिहायचं हा विचारांचा मजकूर मात्र अजून सगळा अस्ताव्यस्त आहे.

तेव्हा यातलं फर्द-फर्द मजेशीर वाटायचं.  आणि आता जेव्हाही मी लिहायला बसतो, माझ्या खयालांचा मज्मूं नेहमीच असा फर्द फर्द झालेला नसतो का?

ताजा कलमः मला ताजी कलमं लावायचा फारच षौक, कदाचित तुला P.S. I Love You आवडतो म्हणून.  तर, मला फारशा न समजलेल्या (म्हणून फारशा मनात न भरलेल्या) गज़लेतला हा शेर.  जाता-जाता या गज़लेचा मक़्ता तेवढा नोंदवून जातो, तो मला फारच आवडलेला कधीतरीः

ये लाश ए बेक़फ़न असद ए ख़स्ता जां की है
हक़ मग़फिरत करे, अजब आज़ाद मर्द था…

याबद्दलही बोलू परत कधीतरी.  मी आहे, आणि ग़ालिबही आहेच!

परत ताजा कलमः फैज़ने (ज्याला सुरेश भट आशियाचा महाकवी म्हणतात) त्याच्या समग्र कवितांच्या संग्रहाला नुस्खहा-ए-वफ़ा असं नाव ठेवलंय, या शेरावरून.

About GD

A 30-something guy. Everything else is open; you read my blogs. Find me on twitter @aintgd to keep in touch.
This entry was posted in ग़ालिब अनुभवावा and tagged , , , , . Bookmark the permalink.

4 Responses to मज्मूं ए ख़याल

  1. संकेत म्हणतो आहे:

    ही पद्धत आवडली. शेर वाचून मनात उधळलेल्या विचारांना स्वैर वाट करून द्यायची. ग़ालिब माझापण आवडता. बर्‍याचदा आपणही काही लिहावेसे वाटते त्याच्यावर, पण आधीच लोकांनी एवढे लिहलेय की आपण ते काय सांगणार असे वाटते आणि थांबतो. पण ’एक्सपर्ट ओपिनिअन’ पेक्षा असे ’ख़यालों के उलझे तानेबाने’ नुसतेच मांडणे पण सुंदर कल्पना आहे. 🙂

  2. aNKIT म्हणतो आहे:

    बहोत खुब

  3. रणजीत म्हणतो आहे:

    माझ्या खयालांचा मज्मूं नेहमीच असा फर्द फर्द झालेला नसतो का. हे तर फारच आवडलं यार

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s