मी, माझं!

माझ्याबद्दल वेगळं असं काय लिहू? सगळा ब्लॉग खुला आहे, अन् त्यापेक्षा काही वेगळं सांगावं असं काही नाहीये – ज्याला नजर असते त्याला सगळंच दिसतं!

माझ्या लिहिण्याचे विषय सहसा माझ्या जिव्हाळ्याच्या प्रांतांमध्ये फिरणारे असतील, पण हे विषय कुठले हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.  सध्या उर्दू साहित्यातील, अन् विशेषत: उर्दू कवितेतील माझ्या थोड्याथोडक्या ज्ञानावर मी सुरूवात करतोय, पण ही यात्रा अगदी कुठल्याही गंतव्यावर जायला मागेपुढे पाहणार नाही.  पण सहसा मी पुस्तकं ई. ई. च्या आसपास फिरत असेल.

उर्दु-फारसी मधील तत्सम शब्द लिहितांना मला नुक्तायुक्त शब्द लिहायला आवडतात.  गालिबच्या नावात ग गणपतीचा ग म्हणजे अगदी कसातरीच दिसतो, पण तांत्रिक अडचणी आहेत, बरहा कधीकधी कुरकुर करते, त्यामुळे गमभनच्या फायरफॉक्स एक्स्टेंशनवर काम चालवावं लागतं.  लिखाणात सलगता रहावी म्हणून मग विना-नुक्ता देवनागरीनुसार लिहायचं मी ठरवलं आहे.

ब्लॉगच्या नावाविषयीची कथा ज्या जिज्ञासूंना जाणून घ्यायची असेल त्यांनी नवा-ए-सरोश आणि गुहर होने तक या दोन पोस्ट्सवर नजर टाकावी.

आणि मला फीडबॅक्स आवडतात. एखादी पोस्ट आवडली तर Like बटणावर टिचकी मारायला काय बिघडतं? नाही आवडलं..? सरळ सांगायचं! एखादा शेर नाही समजला, पुर्ण गझल हवी असली, किंवा काहीही.. अगदी लिटरली काहीही, I love feedbacks 🙂 आणि स्पॅम कॉमेंट्स देण्याइतका मराठी माणूस अजून पुढारलेला (?) नाहीये, तर अगदी काहीही चालेल!

अन् शेवटी माझ्याविषयी दोन शब्द सांगतोच!  नाव: गणेश धामोडकर, वय वर्ष सुमारे २७ अन् सध्या नागपुरातील माझ्या खुराडेवजा घरातून मी ही टकटक करतोय; यापेक्षा अधिक काय सांगू? 🙂

1 Response to मी, माझं!

  1. Rupali म्हणतो आहे:

    mala awadlele vakya “स्पॅम कॉमेंट्स देण्याइतका मराठी माणूस अजून पुढारलेला (?) नाहीये” 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s