Category Archives: स्फूट लिखाण

ऋषी नागडा निजतो

​ऋषी नागडा निजतो दारं खिडक्या लावून काळी सावली अंधाराची फिरते यावर, त्यावर जे ते करपत जाते काय? सूंदर. कुठल्याही सौंदर्याला थारा नाही. फांदी? पाखरू? – जा, मर! अंधाराच्या धागे मेंदूतून इकडे तिकडे झोप? कशाला, कसली? नुसता लिंगाशी चाळा हातापायांना झटके … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

मेलेल्या माणसाची डायरी

समजा आपला मृत्यू झालेला आहे. आपण असं आता कुणी अस्तित्वातच नाही. आपण म्हणून आपण नुसतं आपलं नसणं अनुभवतोय. आहे ते बरं आहे, की नाही त्यामुळे काही गलबलून येतंय – कशाचा कशाला आपल्याला पत्ता नाही. आपण नुसतं शांतपणे सगळं पाहत आहोत … Continue reading

Posted in मेलेल्या माणसाची डायरी, स्फूट लिखाण | Tagged , , , , | १ प्रतिक्रिया

मग परत सगळं शांत

आज तुझ्या नावानं दुसर्‍या कुणाला हाक मारली,जरासं काहीतरी हललं. मग परत सगळं शांत!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , | 4 प्रतिक्रिया

आज, कदाचित

हे मी तुला कळू नाही देणार अर्थातचपण आज जर माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडलीसतर मला कदाचित तुला झिडकारता नाही येणार नेहमीसारखं,अन् मलाही रडू फुटेल कदाचित!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

आरोमले…

काय गायलीस पोरी!  काल ऐकलं पहिल्यांदा अन्‌ ऐकतोच आहे तेव्हापासून.  सडा शिंपलेल्या अंगणात सकाळी सकाळी तुळशीजवळ लावलेल्या उदबत्तीतून गोलगोल सुगंधाचे धूसर गोल मंद मंद वर वर विरळ होत जावेत तसा फिरतोय तुझा आवाज माझ्या मनी-मानसी, आरोमले…, जीव पिळून, “नको जाऊ … Continue reading

Posted in स्फूट लिखाण | Tagged , , , , , , | 5 प्रतिक्रिया

काईतरी हुकेल आय

काईतरी हुकेल आय सायाचं.  कदीपासून नुसता बशेलच आये, पांढरे पानं पाऊन रायलो, गाने आयकून रायलो.  फेसबूकवर त्या ब्लॉगचं पेज केलं, सगळ्यायले लाईक कर्‍याले बी सांगलं (कोनं केलं नाई ते गोष्ट अलग).  तेच्यावर नवी पोष्ट बी लिव्याची होती, पन काईच नाई … Continue reading

Posted in स्फूट लिखाण | Tagged , , , , , , | १ प्रतिक्रिया

रडू्च फुटत नाहीये!

जसं काही कुणीतरी खूप जवळचं वारलंय,अन्‌ मख्खासारखा बसलोय मी!कदाचित कधीच भरून येणार नाही ही पोकळी.मन कायकाय अन्‌ कायकाय विचार करत बसलंय;भरून आलंय असं की कधीही फूटून कोसळायला लागेल,अन्‌ इतकं रितं की रडू्च फुटत नाहीये!

Posted in स्फूट लिखाण | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

कुठेतरी काहीतरी अडलंय!

आलो मी एकदाचा परत या ब्लॉगवर!  लिहायला काय? लिहायला बसलो की मी बसतो लिहित, पण हे मराठीत लिहिणं म्हणजे फारच कठीण काम, फार प्रामाणिक वगैरे होऊन बसतं ते, अन्‌ मग वांधे होतात.  त्यापेक्षा आपलं The Blog of Reflections बरं, धरलं … Continue reading

Posted in स्फूट लिखाण | Tagged | 2 प्रतिक्रिया

शोध

नुसतेच मुंग्या माकोड्यांचे दिवस आलेयत, एखादी इंगळी तर काळजाला डसावी?

Posted in स्फूट लिखाण | १ प्रतिक्रिया